बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; शेकडो हेक्टर ऊसाचे नुकसान 

प्रशांत बर्दापूरकर 
Thursday, 3 September 2020

पावसासोबत जोराचा वारा असल्याने आता महिनाभरात कारखान्याला जाणारा ऊस आडवा पडला. या वा-याच्या झटक्याने काही ऊस तर मोडून व उन्मळून पडला आहे. यात शेतक-यांच्या शेकडो हेक्टर उसाचे नुकसान झाले आहे.

अंबाजोगाई (बीड) : तालुक्यातील देवळा परिसरात गुरुवारी (ता.३) दुपारी साडेचार वाजता जोराचा वादळी वा-यासह पाऊस झाला. या पावसामुळे उभा असलेला ऊस जमिनीलगत आडवा पडल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी तालुक्यात विविध गावात कमी, अधिक पाऊस झाला. देवळा, अकोला परिसरात तर या पावसाने कहरच केला.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

पावसासोबत जोराचा वारा असल्याने आता महिनाभरात कारखान्याला जाणारा ऊस आडवा पडला. या वा-याच्या झटक्याने काही ऊस तर मोडून व उन्मळून पडला आहे. यात शेतक-यांच्या शेकडो हेक्टर उसाचे नुकसान झाले आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन   

या वादळी पावसाने देवळा परिसरातील सर्व ऊसाचे क्षेत्र सपाट झाले आहेत. शासनाने तात्काळ याचे पंचनामे करावेत. आधी मूग गेला, सोयाबीनचे पीकही करपा आणि बुरशीने जाण्याच्या मार्गावर आहे. अशा नैसर्गिक आपत्ती साठी शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी देवळ्याचे ऊस उत्पादक शेतकरी रविंद्र देवरवाडे यांनी केली आहे.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed district rain news Damage hundreds of hectares sugarcane