
परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येला दीड वर्षांहून अधिक काळ उलटला तरी मारेकऱ्यांना अटक झालेली नाही. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी मुंडेंच्या कुटुंबियांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी आंदोलनानंतर विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.