Beed : वीजेचा धक्का लागून पती-पत्नीचा दोघांचा मृत्यू

पतीसही वीजचा धक्का लागून पती-पत्नी या दोघांचा मृत्यू झाला आहे.
electric shock
electric shocksakal

केज : आंघोळीचे पाणी तापविण्यासाठीच्या विद्युत हिटरला स्पर्ष झाल्याने वीजेचा धक्का बसून पती-पत्नी या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (ता.२५) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव येथे घडली. या घटनेत मयत झालेल्यांमध्ये ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे व त्यांची पत्नी इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे या दोघांचा समावेश आहे.

तालुक्यातील पिंपळगाव येथे ज्ञानेश्वर सुरवसे हे पत्नी इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे व आईसह वास्तव्यास आहेत. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठून इंदुबाई या बकेटमध्ये आंघोळीचे पाणी घेऊन विद्युत हीटर सुरू करण्याकरिता वीजेच्या बोर्डावरील बटन दाबत असताना त्यांना वीजेचा धक्का बसला.

त्यामुळे पत्नीस वाचवण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वर सुरवसे या पतीसही वीजचा धक्का लागून पती-पत्नी या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव व बाळराजे सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. अपघाताची नेमकी घटना कशी घडली याचा पोलीस तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com