esakal | Beed: शेळ्यांचा मृत्यू; शेतकरी चढला पाण्याच्या टाकीवर
sakal

बोलून बातमी शोधा

 पाण्याच्या टाकीवर चढलेले शेतकरी

अंबाजोगाई : शेळ्यांचा मृत्यू; शेतकरी चढला पाण्याच्या टाकीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई, ता.१४ (बातमीदार) ः तालुक्यातील पठाण मांडवा येथील एक शेतकरी गुरूवारी (ता.१४) त्याच्या शेळ्या दगावू लागल्याने हतबल झाला होता. या नैराश्यातून तो गावच्या पाण्याच्या टाकीवर चढला. ही माहिती पोलिसांना कळताच, त्यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांची समजूत काढली आणि खाली उतरवले. या घटनेमुळे पशुवैद्यकीय अधिकारीही गावात पोचले. त्यांनी मृत शेळीचे शवविच्छेदन करून इतर आजारी शेळ्यांवरही उपचार केले.

घटनेची माहिती अशी, किसन धावजी पवार (वय ५५) यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. सध्या त्यांच्याकडे २७ शेळ्या आहेत. परंतु मागील आठ दिवसांपासून अज्ञात आजाराने त्यांच्या ११ शेळ्या दगावल्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गुरूवारी सकाळीही त्यांची एक शेळी दगावली. या नुकसानीमुळे ते हतबल झाले. अखेर काय करावे म्हणून ते गावच्या पाण्याच्या टाकीवर चढले. याची वार्ता गावात पोचताच गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे व सहकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी किसन पवार यांची समजूत काढून खाली उतरविले.

हेही वाचा: Pune : जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

दरम्यान याबाबत पशुवैद्यकीय विभागाला कळताच त्यांचे पथकही घटनास्थळी पोचले. पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बोयाळ, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल केंद्रे व पर्यवेक्षक जहागीरदार यांनी मृत शेळीचे विच्छेदन करून प्रयोगशाळेला अहवाल पाठवला. इतर आजारी शेळ्यांवरही त्यांनी उपचार केले.

या शेतकऱ्याच्या किती शेळ्या मृत झाल्या आहेत ते माहीत नाही, परंतु ते १० ते ११ शेळ्या दगावल्याचे शेतकरी सांगतो. आम्ही एका मृत शेळीचे विच्छेदन केले. इतर शेळ्यांच्या आजारावरून त्यांना न्यूमोनियाचा असल्याचा अंदाज आहे. तसे उपचारही सुरू केले आहेत. मात्र प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच शेळी कुठल्या आजाराने दगावली याचे नेमके कारण कळेल.

-डॉ. अनिल केंद्रे, पशुधन विकास अधिकारी

loading image
go to top