
Heavy Rains Destroy Cotton Crops in Gevrai
Sakal
गेवराई : सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने गेवराईतील शेतक-यास आर्थिक आधार देणा-या कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने गोदावरी काठावरील कपाशीचे पिक पुर्णतः बाधित झाल्याने कपाशीच्या झाडाच्या नुसत्या काड्या राहील्याने हातातोंडाशी आलेल्या पांढ-या सोन्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटणार असल्यामुळे शेतक-यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.