Ganesh Visarjan: हलगी, ढोल-ताशांच्या तालावरच विसर्जन; डीजे वाजवल्यास थेट गुन्हे दाखल, १७५९ गणेश मंडळांना नोटिसा

1,759 Ganesh Mandals Served Notices: बीडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेला पूर्णपणे बंदी; १,७५९ गणेश मंडळांना प्रशासनाच्या नोटिसा
 DJ Ban

DJ Ban

esakal

Updated on

बीड : आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने यंदा डीजे आणि साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील तब्बल १७५९ गणेश मंडळांना नोटिसा बजावल्या असून, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट साहित्य जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे ऐवजी हलगी, ढोल-ताशा आणि बॅंजोसारख्या पारंपरिक वाद्यांचाच वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मर्यादित आवाजाचा केवळ एकच स्पीकर वापरता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com