Beed Land Scam: बीडमध्ये २४१ कोटींचा भूसंपादन घोटाळा; महसूल कर्मचारी, वकिलांच्या साखळीचा प्रताप, ७३ कोटी वाटूनही घेतले, गुन्हा दाखल
Revenue Officials, Employees and Lawyers Involved: बीड जिल्ह्यात १५४ भूसंपादन प्रकरणात २४१ कोटी रुपयांचे बनावट आदेश उघड. महसूल अधिकारी, कर्मचारी व वकिलांचा संगनमत, १० संशयितांविरुद्ध गुन्हा.
बीड : तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी करून येथे १५४ भूसंपादन प्रकरणात २४१ कोटी रुपयांचे बनावट आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. यातील ७३ कोटी रुपयांचे वितरणही झाले आहे.