esakal | दोन ग्रामसेवकांचे निलंबन, कोरोनाकाळातही ठेवला आठवडी बाजार सुरू

बोलून बातमी शोधा

vegetable market
बीडमध्ये दोन ग्रामसेवकांचे निलंबन, कोरोनाकाळातही ठेवला आठवडी बाजार सुरू
sakal_logo
By
पांडूरंग उगले

माजलगाव (बीड): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून आठवडी बाजार भरविण्यात आला. यामुळे तहसीलदार वैशाली पाटील यांनी भाटवडगाव, ब्रम्हगाव येथील दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करत प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.

कोरोनाची दुसरी लाटीचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून रोज कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या वर जात आहे. वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. यातच राज्य शासनानेही संचारबंदी लागू करून गुरुवार (ता. २२) पासून राज्यात कडक निर्बंध लावून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू

अशातच बुधवारी (ता. २१) शहराजवळ असलेल्या भटवडगाव, ब्राम्हगाव हद्दीत आठवडी बाजार भरविण्यात आला. यामुळे त्याठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचे निदर्शनास आले. यामुळे तहसीलदार वैशाली पाटील यांनी भाटवडगाव येथील ग्रामसेवक एस.एम. चव्हाण, ब्रम्हगाव येथील ग्रामसेवक ए. एन. दाउदसरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करत कार्योत्तर मान्यतेसाठीचा प्रस्ताव बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा: आठवडाभरातच कोरोनाने आईनंतर मुलाचा मृत्यू; रुग्णालयात मुलं, सुनांवर उपचार सुरु

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने तालुक्यात कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीच गय केली जाणार नाही.

वैशाली पाटील, तहसीलदार.