esakal | होम आयसोलेट रुग्णांना एका फोनवर जेवणाचा डबा घरपोच, 'अन्नपूर्णा'चा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Parli News Tiffin box

दरम्यान फेब्रुवारीपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्या पाँझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशनची व्यवस्था करण्यात येत आहे.

होम आयसोलेट रुग्णांना एका फोनवर जेवणाचा डबा घरपोच, 'अन्नपूर्णा'चा पुढाकार

sakal_logo
By
प्रविण फुटके

परळी वैजनाथ(जि.बीड) : येथील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेट केलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाच्या डब्याची घरपोच सेवा फक्त एका फोनवर करण्यात येत आहे. शहरातील या सामाजिक संस्थेची सुरुवात २०१३ मध्ये झाली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रूपये घेऊन १०० नागरिकांना ठराविक जेवण दिले जात आहे. मात्र अन्नपूर्णा ट्रस्टच्या वतीने येथे येणाऱ्या नागरिकांना एक रूपया न घेता पोटभर १०० च्या ऐवजी २५० च्या वर गरजवंताना रोज जेवण दिले जात आहे.

डाॅक्टराकडे मेडिसिनची पदवी नाय! पण कोरोना रुग्णांवर उपचार सुरु, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरात धक्कादायक प्रकार  

दरम्यान फेब्रुवारीपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्या पाँझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशनची व्यवस्था करण्यात येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढला असून कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. घरातील सर्वजण पाॅझिटीव्ह होत असल्याने जेवणाचे हाल होत आहेत. अशा नागरिकांसाठी अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एका फोनवर या रुग्णांना दोन वेळेचे घरात जेवढे सदस्य आहेत तेवढ्या लोकांचा मोफत जेवणाचा डबा घरपोच सोमवारपासून (ता.पाच) देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी दोन कुटूंबाना डबे देण्यास सुरवात झाली आहे. शहरातील ज्या रुग्णांना आवश्यकता आहे, त्यांनी अन्नपदार्थ चॅरिटेबल ट्रस्टचे राकेश चांडक मो.नंबर ९९२१७७७७६१ व अनिल लाहोटी ८९७५५७०५७०  यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image