

Beed Leopard
sakal
बीड : तालुक्यातील लिंबागणेश गावाच्या पोखरवाडा शिवारात शुक्रवारी (ता. १२) रात्री पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तातडीने दखल घेतली. त्यानंतर शनिवारी (ता. १३) वनविभागाचे अधिकारी गावात दाखल झाले.