बीड : चंदनासह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाजनवाडीत धाडशी कारवाई; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल
Beed Mahajanwadi police Action illegal business
Beed Mahajanwadi police Action illegal business

केज - अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या मोहिमेमुळे चर्चेत असणाऱ्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर असलेल्या महाजनवाडी येथे छापा मारून एका घरात साठून ठेवलेले चंदन व त्यासाठीचे साहित्य असा एकूण वीस लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमालासह एकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ११ जणांविरोधात शनिवारी (ता. २३) नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील अशोक रामहारी घरत याने बेकायदेशीररीत्या काही जणांच्या मदतीने शिवारातील शेतात चंदनाची झाडे चोरून तोडून त्यातील गाभा चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी घरात आणून ठेवला होता, या बाबतची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना शनिवारी सायंकाळी मिळाली होती. या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन शनिवारी रात्री छापा मारला. यावेळी चंदनाची खोडे तासीत असणारा एक जण जागीच मिळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले, अशोक रामहारी घरत (रा. महाजनवडी, ता. बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता ४९९ किलो चंदनाचा तासलेला गाभा, लाकडे, वजन काटा, वाकस, कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण २० लाख ७२ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिस हवालदार बालाजी शेषेराव दराडे यांच्या तक्रारीवरून एकूण ११ जणांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही धाडशी कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधिक्षका कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, पोलिस बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, अमजद सय्यद, राजू वंजारे, रामहरी भांडाने, संजय टूले, शिवाजी कागदे, दीपक जावळे व महिला पोलिस नाईक अशा चोरे यांनी केली.

तीन कंपनी मालकांचाही समावेश

यात गुन्हा दाखल झालेल्यांत ज्यांना चंदन पुरवायचे होते, त्या तीन कंपनीच्या मालकांचाही समावेश आहे. यात कुंटन शेख आणि शमशोभाई चावला (रा. सेंधवा, मध्य प्रदेश), अमितभाई (रा. हैदराबाद) यांचा समावेश आहे. तसेच गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अशोक रामहरी घरत (रा. महाजनवाडी), अतिक शेख, शेख जावेद (दोघेही रा. नेकनूर), मारुती वाघमोडे, कल्याण वाघमोडे (दोघेही रा. शेवगाव, जि. नगर), विष्णू बांगर (साक्षाळ पिंपरी), विलास पवार (पात्रुड, ता. भूम, जि. उस्मानाबाद), दत्ता गर्जे (रा. महासांगवी, ता. पाटोदा) यांचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com