बीड : माजलगावातील दिंद्रुड मंडळात मुसळधार पाऊस

मोगऱ्यात झाेडपधार : पिकांचे नुकसान, गाव पाहणीची मागणी
Beed Majalgaon Dindrud Heavy rain crops Damage
Beed Majalgaon Dindrud Heavy rain crops Damage

माजलगाव : गुरूवारी दिवसभर जाणवलेल्या उकाड्यानंतर रात्री दमदार पाऊस झाला. तालुक्यातील दिंद्रुड महसुल मंडळात ६१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून याच मंडळातील मोगरा गावात अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्याने खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर गावाला जोडणारा पूल वाहून गेला.

मागील आठ दिवसांपासून गायब झालेला पाऊस गुरूवारी रात्री चांगलाच बरसला. गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी हलक्या सरी बरसल्या होत्या परंतु काही वेळानंतर वातावरणात बदल होऊन काळे ढग गायब झाले व ऊन पडले. वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी सहा वाजेनंतर शहरासह तालुका परिसरात आभाळात काळ्या ढगांनी गर्दी करत पावसाचे वातावरण निर्माण केले. रात्री दहा वाजेनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.

तर मोगरा गावात अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्याने पाण्यामुळे गावाला जोडणारा पूल वाहून गेला. यामुळे काही काळासाठी गावाचा संपर्क तुटला होता तर गोदावरी नदी देखील भरून वाहत आहे. दरम्यान या पावसामुळे मोगरा गावातील वीज गायब झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे वांधे झाले आहेत. शिवाय खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने गावाची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

पूल ओलांडताना महिला गेली वाहून

गुरूवारी रात्री मोगरा येथे झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात पूल वाहून गेला. पुल ओलांडताना सोनाली सखाराम बिजुले ही महिला वाहून गेली. परंतु या महिलेस पोहता येत असल्याने ती थोडक्यात बचावली. तिच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.

पुलाची दुरुस्ती कधी ?

गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठा ओढा असून या ओढ्यावर मागील पंचवीस वर्षांपूर्वीचा पूल आहे. या पुलावरूनच गावातील शाळकरी मुले व ग्रामस्थ ये-जा करतात. त्यामुळे हा पूल प्रशासनाने तत्काळ दुरुस्त करून देण्याची गरज आहे.

गुरुवारी रात्री मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

  • दिंद्रुड ६१

  • माजलगाव ११

  • गंगामसला ५.३.

  • किट्टी आडगाव ६

  • तालखेड ३.३

  • नित्रुड २७.३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com