बेकायदा गर्भपात प्रकरणी डॉ. सानपला सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

बीड - राज्यभर गाजलेल्या बीड येथील बेकायदा गर्भपात प्रकरणी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिवाजी सानप यास गुरुवारी (ता. 22) येथील दुसरे सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील इतर तीन डॉक्‍टरांसह पंधरा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोन जून 2011 रोजी बीडमध्ये बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन डॉक्‍टरांसह 16 जणांविरोधात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्यासमोर झाली. साक्षीपुरावे तपासून डॉ. सानपला काल दोषी ठरविण्यात आले, तर पंधरा जणांची निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीश गांधी यांनी आज डॉ. सानपला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
Web Title: beed marathwada news crime dr shivaji sanap punishment