आमदार पंडितांविरोधात पुरवठा अधिकारी पोलिसांत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

बीड - जातिवाचक शिवीगाळ, धमकावणे आणि समर्थकांकडून आमदार अमरसिंह पंडित यांना खंडणी देण्याची सूचना दिल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी मंगळवारी पोलिसांत केली आहे. आमदार पंडित यांच्यासह त्यांचे खासगी स्वीय सहायक जालिंदर राऊत व सुभाष पाटील यांचीही नावे नमूद करून गुन्हा नोंद करावा, असे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आमदार पंडित यांनी सांगितल्याप्रमाणे गेवराई तालुक्‍यातील साठेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान कोळगाव येथील स्वस्त धान्य दुकानास जोडण्याचे आदेश दिले नाहीत, तर जिल्ह्यात नोकरी करणे मुश्‍कील होईल, परिणाम वाईट होतील, अशी धमकी जालिंदर राऊत यांनी दिली. मात्र, नियमानुसारच काम होईल असे सांगितल्यानंतर धमकी देऊन जातिवाचक बोलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, सुभाष पाटील याने फोन करून आमदार अमरसिंह पंडित महसूलमंत्र्यांकडे तुमची तक्रार करून नोकरीतून काढणार आहेत, त्यांना बोलून तोडपाणी करून सांगितलेली कामे करून त्यांना काही पैसे देऊन प्रकरण बंद करा, भेटा, संपर्क करा, असा निरोप दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: beed marathwada news mla amarsinh pandit crime supply officer