

Beed Massajog Sarpanch Election Result
esakal
Beed Santosh Deshmukh Case: सव्वा वर्षानंतर मस्साजोगचं सरपंच पद अखेर देशमुखांना मिळालंय. पण अश्विनी देशमुख नव्हे तर, स्वरुपानंद देशमुख यांना. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तेव्हा सगळीकडे चर्चा त्यांच्याच नावाची होती. पण फासे पलटले अन् अश्विनी देशमुखांच्या ऐवजी स्वरुपानंद देशमुखांच्या पारड्यात सरपंच पद पडलं. त्यांनी अश्विनी देशमुखांचा ९२ मतांनी पराभव केला. मस्साजोगची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरु होते. पण, यावर एकमत होऊ शकले नाहीत. मस्साजोग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्वरुपानंद देशमुखांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही अन् सरपंचपदाच्या लढतीत स्वरुपानंद देशमुख विरुद्ध अश्विनी देशमुख यांच्यात ही लढत झाली. अन् त्यात स्वरुपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी झालेत.