
Beed shocker unidentified men attack family with sharp weapons at midnight
Esakal
बीडमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आता त्याच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला केलाय. यात चार महिला जखमी झाल्या आहेत. यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती समोर आलीय. अज्ञातांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला तशाच अवस्थेत थेट पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी अज्ञातांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर जखमी व्यक्तींना बीडच्या सरकारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. चार पैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते.