

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावात मध्यरात्रीच्या सुमारास मशिदीत स्फोट घडवून आणल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन युवकांनी जिलेटीनच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी तातडीने त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.