esakal | अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा, दोन लाख ८९ हजारांची रक्कम परस्पर केले ट्रान्सफर
sakal

बोलून बातमी शोधा

Beed crime news

अक्षयकुमार देशमुख या विद्यार्थ्याने बुधवारी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात केज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा, दोन लाख ८९ हजारांची रक्कम परस्पर केले ट्रान्सफर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केज (जि.बीड) : शहरातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या बँक खात्यातून अज्ञाताने नेट बँकिंगच्या माध्यमातून दोन लाख ८९ हजार रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता.२०) पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील माधवनगर भागातील अक्षयकुमार हनुमंत देशमुख हा विद्यार्थी पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'

त्याचे शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या केज शाखेत खाते आहे. या बँक खात्यात त्याच्या वडिलांनी शिक्षणासाठी दोन लाख ८४ हजार ४९९ रुपयांची रक्कम जमा केली होती. त्याला सहा जून रोजी फोन पे ॲपवर कॅश बँकेचे नोटिफिकेशन आले. त्यात वेगवेगळ्या फोन नंबरच्या लिंक आल्या. या लिंकवर गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्याच्या खात्यावरून नव्वद हजार ७९८ रुपयांची रक्कम ट्रान्सफर करून घेतली. त्यानंतर त्याला फोनवरून संपर्क करून अज्ञाताने मोबाइलवर टीम व्ह्युवर हे ॲप इंस्टॉल करून घेण्यास सांगितले.

ग्रामसेवकाच्या आत्महत्येचे ‘झेडपी’त तीव्र पडसाद, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

त्याचबरोबर नेट बँकिंग अपडेट करून देतो, असे म्हणत आणखी एक लाख ९८ हजार २०२ रुपये ट्रान्सफर करून घेतले. अक्षयकुमार देशमुख याने ७ जून २०२० रोजी एकास संपर्क केला असता सदरील व्यक्तीने 'फोन-पे' चा एजंट असल्याचे व तुमचे खाते हॅक झाले असल्याचे सांगून दहा जूनपर्यंत तुमची खात्यावरून कपात झालेली रक्कम परत करू असे सांगितले. मात्र अद्यापही दोन लाख ८९ हजार रुपयांची रक्कम काही परत मिळालेली नाही.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

पुन्हा संबंधित व्यक्तीस फोन केला असता मोबाईल क्रमांक बंद होता. यावरून देशमुख यास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अक्षयकुमार देशमुख या विद्यार्थ्याने बुधवारी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात केज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image