माजलगांवात उस आंदोलन पेटले

कमलेश जाब्रस
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

शेतक-यांनी टायर पेटवुन देत याठिकाणी शासनाचा निषेध करत शेतक-यांची होणारी अडवणुक शासनाने तात्काळ थांबवावी अशी मागणी यावेळी केली. दरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता

माजलगांव - उस दराबाबत शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेक ठिकाणी उस आंदोलन पेटले असुन परभणी फाट्यावर शेतक-यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवत शासनाच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) टायरची जाळपोळ केली. 

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी बैठक घेउन उसाचा समानदर देउन 265 जातीचे उसाची नोंद न घेणे, माजलगांव, धारूर तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखन्यांनी खाजगी साखर कारखान्यापेक्षा गतवर्षी प्रतिटन सहाशे रूपये कमी दराने रक्कम दिलेली आहे ती रक्कम देण्यात यावी, 265 जातीच्या उसाची नोंद घ्यावी या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात आला. यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते.

शेतक-यांनी टायर पेटवुन देत याठिकाणी शासनाचा निषेध करत शेतक-यांची होणारी अडवणुक शासनाने तात्काळ थांबवावी अशी मागणी यावेळी केली. दरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. महामार्ग अडविल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beed news: agitation