कृषी क्षेत्राचे १४ हजार कोटींचे बजेट ६५ हजार कोटींवर: मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नारायणगडावर विकास कामांचे भूमिपूजन

बीड : मागच्या पंधरा वर्षात नाही तेढ विकास या तीन वर्षात झाला. कृषी क्षेत्राचे १४ हजार कोटी रुपयांचे बजेट आता ६५ हजार कोटी रुपयांवर नेले. मागच्या सरकारच्या कर्जमाफीत मराठवाड्याला १४०० कोटी रुपयांची मादी मिळाली. मात्र, या सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मराठवाड्याला ४००० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग झल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नारायणगडावर विकास कामांचे भूमिपूजन

बीड : मागच्या पंधरा वर्षात नाही तेढ विकास या तीन वर्षात झाला. कृषी क्षेत्राचे १४ हजार कोटी रुपयांचे बजेट आता ६५ हजार कोटी रुपयांवर नेले. मागच्या सरकारच्या कर्जमाफीत मराठवाड्याला १४०० कोटी रुपयांची मादी मिळाली. मात्र, या सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मराठवाड्याला ४००० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग झल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्राची धाकटी पांढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड येथील २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन व ११०० रोपट्यांची लागवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (गुरुवार) दुपारी झाले.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मठाधिपती शिवाजी महाराज, आमदार भीमराव धोंडे, आर टी देशमुख, लक्ष्मण पवार, माजी मंत्री सुरेश धस, बदमराव पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोलहार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, माजी आमदार राजेंद्र जगताप उपस्थित होत्या.  श्री फडणवीस म्हणाले, आगामी काळात पोलिसांची मोथो भरती होईल, २०१९ पर्यंत महाराष्ट्र बेघरमुक्त होईल. जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थी वस्तीगृहासाठी पाच कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी केली. पंकजा मुंडे, जिल्ह्यात तीन वर्षात ७०० किलोमीटर रस्ते बांधले. विविध विकास कामांसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी मिळविला. प्रास्ताविक माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी केले.

गडावर येताच श्री फडणवीस यांनी नागदणारायन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गडाच्या वतीने मठाधिपती शिवाजी महाराज यांनी त्यांचा सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व नगद नारायण महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी गडाच्या वेबसाईट व मोबाईल यॅपचे उदघाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी, मुस्लिम व गडाच्या शिष्ट मंडळांशी चर्चा केली. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

हल्लाबोल नाही; नैराश्येतून बोंबाबोंब : मेटे
मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणावर विकास कामे करत आहेत. मात्र, विरोधक हल्लाबोलचे नाटक करत आहेत. नैराश्येतून वितोधकांची ही बोंबाबोंब असल्याचे विमायक मेटे म्हणाले.

Web Title: beed news agricultural sector budget devendra fadnavis