रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

बीड - रेल्वेत नोकरी लावतो म्हणून फोन कॉल करणाऱ्या भामट्यांनी बेरोजगार तरुणास ५० हजारांचा गंडा घातल्याच्या तक्रारीवरून अज्ञात लोकांवर शनिवारी (ता. २६) येथील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड - रेल्वेत नोकरी लावतो म्हणून फोन कॉल करणाऱ्या भामट्यांनी बेरोजगार तरुणास ५० हजारांचा गंडा घातल्याच्या तक्रारीवरून अज्ञात लोकांवर शनिवारी (ता. २६) येथील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्‍यातील घोगस पारगाव येथील मल्हारी माणिकराव नागरे या तरुणास दोन वर्षांपूर्वी विविध फोन क्रमांकांवरून फोन करून अज्ञात लोकांनी भारतीय रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. यासाठी एसबीआय बॅंकेच्या एका खात्यात ४० हजार ५० रुपये जमा करण्यास सांगितले. मल्हारी नागरे याने सांगितलेली रक्कम संबंधित खात्यात जमा केली; परंतु रक्कम जमा करून अनेक दिवस वाट पाहूनही नोकरीचे नियुक्तिपत्रही आले नाही किंवा फोनही आला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे मल्हारीच्या लक्षात आल्याने शनिवारी (ता.२६) त्याने बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. मल्हारी नागरे याच्या तक्रारीवरून ज्या चार क्रमांकांहून फोन आले, त्या मोबाईल क्रमांकधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी बीड येथील रत्नघोष महादेव वाघमारे या तरुणाची केंद्रीय कृषी मंत्रालयात नोकरी लावण्याच्या बहाण्याने दीड लाखास फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. अगदी त्याच प्रकारे आणखी एक फसवणुकीची तक्रार दाखल झाल्याने बेरोजगारांना लुबाडणारी मोठी टोळीच यामागे कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. याच प्रकारची आणखी काही प्रकरणे उजेडात येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: beed news crime Fraud