बीडमधील कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

बीड - येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने स्वच्छतागृहात जाऊन स्वत:च्या पोटावर जखमा करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

बीड - येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने स्वच्छतागृहात जाऊन स्वत:च्या पोटावर जखमा करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

मोहन दौलत मुंडे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे कैद्याचे नाव आहे. मुंडे याच्यावर बलात्कार, दरोड्यासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या एक जानेवारीला त्याने सकाळी सव्वानऊ वाजता बरॅक क्रमांक सातमधील स्वच्छतागृहात जाऊन धारदार वस्तूने हातासह पोटावर जखमा करून घेतल्या. इतर कैद्यांनी ही माहिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी मुंडे याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Web Title: beed news crime suicide of a prisoner in Beed