लक्ष्मीपूजन जिल्ह्यात उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

बीड - दिव्यांची उजळण करणाऱ्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाला मोठे महत्व आहे. गुरुवारी (ता. १९) जिल्ह्यात अनेकांनी मुहूर्त साधत लक्ष्मीपूजन केले. 

बीड - दिव्यांची उजळण करणाऱ्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाला मोठे महत्व आहे. गुरुवारी (ता. १९) जिल्ह्यात अनेकांनी मुहूर्त साधत लक्ष्मीपूजन केले. 

यंदा लक्ष्मीपूजन करण्याचा उत्तम मुहूर्त सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत होता. हा मुहूर्त साधत घरांमध्ये तसेच दुकाने आणि कार्यालयांमध्ये पूजा करण्यात आली.  अश्विन कृष्ण अमावास्येच्या मुहूर्तावर ही पूजा करण्यात आली. धनाची देवता असलेल्या लक्ष्मीचा फोटो मांडून समोर फळांची आरास आणि रांगोळी काढण्यात आली. घरांसमोरही अशीच सजावट करण्यात आली. पूजनानंतर देवाला आणि धनाला धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे आदींचा नैवेद्य भरवण्यात आला. जिल्हाभरात या उत्सवाचा मोठा उत्साह होता.

Web Title: beed news diwali festival

टॅग्स