Beed News : निजामकाळातही असा क्रूर हल्ला नाही सूत्रधार शोधा - जयदत्त क्षीरसागर

जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ‘‘घटलेल्या घटनांत अनेकांची नावे समोर आली आहे
जयदत्त क्षीरसागर
जयदत्त क्षीरसागर sakal
Updated on

बीड - ‘‘सर्वधर्मसमभाव, सामाजिक सलोख्याचा इतिहास असलेल्या जिल्ह्यात स्वप्नात दिसणार नाहीत, अशा घटना वास्तवात घडल्या. अशा क्रूर, भयंकर, भयानक घटना निजाम-ब्रिटिश राजवटीतही घडल्या नाहीत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यामागचा सूत्रधार कोण आहे, काय उद्देश होता, लोकांना जिवंत जाळायचे होते का,’’ असा संतप्त सवाल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

माजलगावसह बीडमध्ये सोमवारी (ता. ३०) जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीच्या घटना घटल्या. त्यात क्षीरसागर यांच्या येथील बंगल्यासह कार्यालय जाळण्यात आले. जळालेल्या कार्यालयाची शुक्रवारी पाहणी केल्यानंतर क्षीरसागर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘अशा घटना घडत असतील तर सुरक्षित कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. गृहमंत्र्यांना भेटून या घटनांची माहिती दिली आहे. या घटनांत जीवे मारण्याच्या प्रयत्नांसह आवश्यक कलमे लावण्याची शासनाची भूमिका रास्त आहे,’’

असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, की कार्यालयातील कर्मचारी हात जोडून विनवण्या करत होते, तरीही जाळपोळ सुरुच होती. लहान मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्य घरी असताना पेट्रोल बॉम्ब, हत्यार, दगड, गज फेकून मारले जात होते. घटना घडत असताना यंत्रणांना कळायला हवे होते. हे नियोजनबद्ध झाले का, यामागील मास्टरमाईंड कोण याचा शोध पोलिस प्रशासनाने घ्यावा. मात्र, असे प्रकार जिल्ह्यात कधीच घडले नाही, आता सर्वांनी दक्ष राहावे.

जयदत्त क्षीरसागर
बीडमध्ये आंदोलन उग्र; राष्ट्रवादी अन् जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय पेटवलं, महामार्ग अडवले, आमदाराचं घर जाळलं

अनेकांची नावे समोर

जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ‘‘घटलेल्या घटनांत अनेकांची नावे समोर आली आहे. त्यात अनेक धंदे करणारेही आहेत. आपण कधीच कोणाच्या अध्यात-मध्यात नव्हतो. मुंबईतील ‘एक मराठा लाख मराठा’ मोर्चात सहभागी होतो. समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, या मताचा मी आहे.’’

जयदत्त क्षीरसागर
बीड: पाचही संस्था प्रगतीपथावर अभिमान- जयदत्त क्षीरसागर

लातूर जिल्ह्यात आंदोलनकर्त्याची आत्महत्या

लातूर : बोरगाव (काळे, ता. लातूर) येथील एका आंदोलनकर्त्याने मराठा आरक्षणासाठी जीवन संपविले. गोविंद मधुकर देशमुख (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. शेतात शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर संतप्त मराठा समाजातील तरुणांनी त्यांचा मृतदेह आणून लातूर- मुरूड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मृतदेह मुरूडच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.