बनावट नोटा छापणारा बीडमध्ये साहित्यासह जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सय्यद शुकुर शब्बीर हा बनावट नोटा छापत असल्याची माहिती मध्यप्रदेश पोलिसांना मिळाली. त्यावरून मध्य प्रदेश पोलिसांनी बीड पोलिसांशी संपर्क साधला. दोन्ही पथकांनी बुधवारी मध्यरात्री छापा टाकला.

बीड : मध्यप्रदेश व बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहरातील गांधीनगर भागात सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याच्या उद्योगाचा पर्दाफाश केला. बुधवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात सय्यद शुकुर शब्बीर याच्या घरातून ५० रुपये व  १०० रुपयांच्या दीड लाखांच्या नोटा जप्त करत त्याला बेड्या ठोकल्या.

सय्यद शुकुर शब्बीर हा बनावट नोटा छापत असल्याची माहिती मध्यप्रदेश पोलिसांना मिळाली. त्यावरून मध्य प्रदेश पोलिसांनी बीड पोलिसांशी संपर्क साधला. दोन्ही पथकांनी बुधवारी मध्यरात्री छापा टाकला. पोलिस निरीक्षक अनीलकुमार जाधव, एएसअाय शेख, अलगट, वडमारे, पाईकराव, रोकडे, देवकते, वाघ, मुंडे, सानप, श्रीमती सानप यांचा पथकात समावेश होता.

घरात नोटा बनवणारे सर्व साहित्यासह ५० व १०० रुपयांच्या एक लाख ५० हजाराच्या नोटा आढळून आल्या. सय्यद शकुर यास ताब्यात घेतले आहे. बनावट नोटा बनवण्याचे साहित्य देखील सापडले आहे. हे मोठे रॅकेट असल्याने पुढील तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Beed news fake currency one arrested