फर्निचरच्या गोदामाला माजलगावात आग

कमलेश जाब्रस
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

या आगीमध्ये गोदामात असलेली कपाटे, गादी बनविण्याची रूई जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तसेच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी पुढाकार घेतला. दरम्यान या आगीत कसल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही

माजलगाव (जि. बीड)  - शहरातील सागर फर्निचर या दुकानाच्या गोदामाला आज (मंगळवार) सकाळी अचानक लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन आग अटोक्यात आणण्यासाठी नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी प्रयत्न केले. 

शहरात सागर फर्निचर नावाचे दुकान आहे. या दुकानाचे गोदाम विज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ आहे. मंगळवारी सकाळी अचानक याठिकाणी आग लागली. या आगीमध्ये गोदामात असलेली कपाटे, गादी बनविण्याची रूई जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तसेच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी पुढाकार घेतला. दरम्यान या आगीत कसल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही

Web Title: beed news: fire