Beed News : किराणा दुकानदाराचा दरवळला कष्टगंध

प्रतिकूल परिस्थितीत अजीजची एसटीआय पदाला गवसणी
Beed News
Beed NewsSakal

जातेगाव : त्याच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची. एका छोट्या किराणा दुकानावरच वडील संसाराचा गाडा हाकत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत रडत, कुढत बसण्याऐवजी त्याने जिद्दीने अभ्यास केला. वडिलांच्या कष्टाचे मोल समजून घेतले. आज त्याने विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. त्याचा हा कष्टगंध इतर तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. ही यशकथा आहे ती राजापूर (ता गेवराई) येथील अजीज शेख या तरुणाची.

अजीज याने २२५ व्या रॅंकने ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळे आता तो विक्रीकर निरीक्षक होणार आहे. अजीज याचे वडील अमीन यांच्याकडे गुंठाभरही शेतजमीन नाही. दोन मुलांसह मुलगी, पत्नी असा पाच जणांच्या कुटुंबाचा उदनिर्वाह एका छोट्या किराणा दुकानावर चालतो.

पण, अमीन यांनी मुलांच्या शिक्षणासाठी स्वत: दिवसरात्र कष्ट घेतले. त्यांचा मुलगा अजीज यानेही या कष्टाचे चीज केले. अजीज आता विक्रीकर निरीक्षक होणार आहे. परीक्षेत २२५ तर ईडब्लूएसमध्ये त्याने २५ वी रॅंक मिळवली आहे. अजीजचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण राजापूर येथील वसाहतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आणि त्यानंतर गेवराई येथे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे.

जिल्हा परिषद शाळेत जडणघडण

यश मिळवण्यासाठी इंग्रजी शाळा, मोठी नावाजलेली शाळा असावी असा समज असलेल्यांसाठी अजीजचे यश हे झणझणीत अंजन घालणारे आहे. अजीजचे प्राथमिक शिक्षण हे मराठी आणि त्यातल्या त्यात जिल्हा परिषद शाळेतून झाले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी गुणवत्तेत कुठेही मागे नाहीत, हा संदेश यातून मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com