गुटखा प्रकरणामुळे कुंडलिक खांडेंचे शिवसेना जिल्हाप्रमुखपद गेले | Beed News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena
गुटखा प्रकरणामुळे कुंडलिक खांडेंचे शिवसेना जिल्हाप्रमुखपद गेले

गुटखा प्रकरणामुळे कुंडलिक खांडेंचे शिवसेना जिल्हाप्रमुखपद गेले

बीड : गुटखा प्रकरणात नाव येऊन गुन्हा नोंद झाल्याचे शिवसेनेचे (Shiv Sena) जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundalik Khande) यांच्या पदाला पक्षाने स्थगिती दिली आहे. मात्र, याचवेळी पक्षाने नवे नाव न जाहीर केल्याने इच्छुकही ‘सलाईन’वर गेले आहेत. अलीकडे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी होत असतानाच पक्षांतर्गत बंडाळी आणि गटबाजीने चांगलेच डोके वर काढले आहे. काही महिन्यांपूर्वी अप्पासाहेब जाधव यांच्या जिल्हाप्रमुखपदावरील निवडीनंतर पक्षातीलच पदाधिकाऱ्याने विरोध गेल्याने भर रस्त्यात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर या पदाधिकाऱ्याने थेट जाधव यांची निवड रद्द करावी अन्यथा आपण शिवतीर्थावर जिव देऊ अशी भूमिका घेतली. पक्षातील बड्या नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण निपटते न निपटते तोच बीडमध्ये मंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितीत संघटनेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जिल्हाप्रमुख स्वत:च्या व्यवसायात मग्न आहेत, त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलनाला वेळ नाही. पाठबळ (Beed) मिळत नाही, असे गंभीर आरोप केले.

हेही वाचा: हातात असलेल्या बंदुकीतील गोळी लागून जवानाचा दुर्दैवी मृत्यू

यानंतर आरोप करणाऱ्यांपैकी एका उपजिल्हा प्रमुखावर जिवघेणा हल्लाही झाला. हल्ल्यातील आरोपींपैकी एक पक्षातीलच निघाला. यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली. याच काळात शिवसेनेतील एक गट जिल्हाप्रमुख बदलासाठी मुंबईत तळ ठोकून होता. मात्र, पक्षाने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर मेहरबानी कायम ठेवली. मात्र, गेल्या आठवड्यात सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्यांच्या गोदामांवर छापे टाकले. यातील एक आरोपी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव पोलिस दफ्तरी नोंदले गेले. त्यानंतर अखेर पक्षाने सोमवारी (ता. २२) खांडे यांच्या पदाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले. मात्र, याच वेळी इच्छुकांची अर्धा डझन संख्या असताना पक्षाने नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव का, जाहीर केले नाही, असा प्रश्न आहे.

loading image
go to top