मद्यपी मुख्याध्यापकाने घातला शाळेतच गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

माजलगाव - तालुक्‍यातील सिमरी पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक यू. आर. धन्वे यांनी सोमवारी (ता. 19) शाळेतच दारू पिऊन गोंधळ घातला. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी शाळेत येऊन त्यांना चोप दिला, यानंतर घटनास्थळी पोलिस व गटविकास अधिकाऱ्यांनी भेट दिली. 

सिमरी पारगाव येथे जिल्हा परिषदेची इयत्ता आठवीपर्यंत शाळा आहे. या ठिकाणी आठ शिक्षक कार्यरत आहेत. यू. आर. धन्वे हे मुख्याध्यापक असून मागील एक वर्षापासून या शाळेचा कारभार पाहत आहेत. अनेकवेळा शाळेतच दारू पिताना ते आढळून आले आहेत. हा प्रकार मागील एक वर्षापासून सुरू असून याबाबत अनेकवेळा केंद्रप्रमुखांसह गावकऱ्यांनी समजावून सांगूनही याकडे धन्वे यांनी दुर्लक्ष केले होते. 15 जूनपासून शाळेला सुरवात झाली असून शाळा सुरू होताच या मुख्याध्यापकाने वर्गात दारू पिणे चालूच ठेवले होते. सोमवारी शाळेतच दारू पिऊन शाळेत गोंधळ घालण्यास सुरवात केली, तसेच शाळेत असलेल्या साहित्याची तोडफोड केली. ही माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकास चांगलाच चोप देऊन कोंडून ठेवले, त्यानंतर दिंद्रुड पोलिस ठाणे व गटविकास अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. दिंद्रुड पोलिस काही वेळात घटनास्थळी पोचले व माजलगाव येथील गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण, तसेच पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित मुख्याध्यापकास दिंद्रुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: beed news majalgaon zp school