शेवंतीने खाल्ला झेंडूपेक्षा भाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

बीड - लक्ष्मी पूजन व घराची सजावट करण्यासाठी झेंडू फुलांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी गुरुवारी (ता. १९) मोठी गर्दी केली. या वेळी शेवंतीने झेंडूपेक्षा जादा भाव खाल्ल्याचे दिसले. शेवंतीला किलोमागे दोनशे रुपये, तर झेंडूला शंभर रुपयांचा दर होता. यंदा इतर जिल्ह्यांतून फुलांची आवक झाल्याचे दिसून आले.

यंदा शेतात पाणी असल्याने शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांच्या उत्पादनाकडे कल वळवला. पाऊसकाळ चांगला झाल्याने दिवाळीच्या सणासाठी बाजारात खरेदीचा उत्साहही आहेच. त्यामुळे दसऱ्यापाठोपाठ दिवाळीलादेखील फूलाला चांगली मागणी राहिली. झेंडूची फुले ८० ते १०० रुपये किलो, तर शेवंती २०० रुपये किलोचा भाव होता. शहरातील जालना रोड, नगर रोड  या भागात मोठ्या प्रमाणात फुलं विक्रीसाठी आले होते. दरम्यान, दुपारनंतर फुलांचे तेज कमी होत जात होते तसा भावही घसरत होता.

Web Title: beed news Marigold Shevanti