तीन महिन्यांत ४६३ मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

बीड - जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे, यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती बदलली आहे. यापूर्वी दोन महिने जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर जिल्ह्यातील पाणी, तसेच पीकपरिस्थितीचेही चित्र बदलले. विशेष म्हणजे यंदा तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ६६६ मिलिमीटर या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ४६३.२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी आजपर्यंत केवळ ३३९.१० मिलिमीटर पाऊस होता. गतवर्षीपेक्षा यंदा आजपर्यंत तब्बल १२५ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. 

दीर्घ उघडीप दिल्यानंतर १९ ऑगस्टपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे रात्रीतून जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती पालटली. 

जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्याच्या उत्तरार्धात चांगला पाऊस पडतो. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आगामी ऑक्‍टोबर महिन्यातही चांगला पाऊस झाल्यास यावर्षी पुन्हा पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्‍क्‍यांवर जाण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान होणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत या कालावधीत १०९.३९ टक्के इतका पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. आगामी कालावधीत काही मोठे पाऊस झाल्यास जिल्ह्यातील धरणे भरण्याची शक्‍यता आहे.

पाच मध्यम, तर  २४ लघुप्रकल्प तुडुंब
पावसामुळे महासांगवी, कांबळी, बिंदुसरा, तलवार, ऊर्ध्व कुंडलिका या पाच मध्यम प्रकल्पांसह भायाळा, कटवट, सुलेमान देवळा, मुंगेवाडी, शिवणी, पांढरी साठवण तलाव, पांढरी पाटबंधारे तलाव, खटकाळी, मोरझलवाडी, धामणगाव, भंडारवाडी, डोकेवाडा, करचुंडी, ब्रह्मगाव, वडगाव, इंचरणा, लांबरवाडी, पिंपळा, वसंतवाडी, भुरेवाडी, सौताडा, बेलगाव, पिंपळवंडी, चारदरी आदी लघुप्रकल्प भरले आहेत. माजलगाव व मांजरा धरणातील उपयुक्त जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. २० प्रकल्पांतील जोत्याखाली असलेला पाणीसाठा आता प्रकल्पाच्या जोत्याच्या वर आला आहे.

Web Title: beed news rain