सोशल मीडियापेक्षा तरुणांनी व्यायामाचा छंद जोपासावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पाटोदा - आजच्या पिढीतील तरुणांनी सोशल मीडिया वापराच्या छंदापेक्षा व्यायामाचा छंद जोपासणे गरजेचे आहे, कुस्तीपटू राहुल आवारे याने पाटोदासारख्या भागात तालमीची निर्मिती करून तरुणांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी व्यक्‍त केले.

पाटोदा शहराजवळ चुंबळी फाटा परिसरात रविवारी (ता.२७) कुस्तीपटू राहुल आवारे याच्या जय हनुमान व्यायामशाळेचे उद्‌घाटन राम शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. शिंदे बोलत होते.

याप्रसंगी आमदार भीमराव धोंडे, उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीद, बीड जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोविंद चव्हाण, राधाताई महाराज, रामकृष्ण रंधवे बापू, सतीश शिंदे, अजय काशीद यांच्यासह अनेक नामवंत कुस्तीपटूंची उपस्थिती होती. 

यावेळी श्री. शिंदे म्हणाले, राहुल आवारे याला ऑलिम्पिकमध्ये खेळता यावे, यासाठी आपण मोठे प्रयत्न केले, मात्र ती संधी मिळू शकली नाही. पुढील वेळी तो निश्‍चितच ऑलिम्पिकमध्ये खेळेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास पाटोदा परिसरातील कुस्तीप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानिमित्त येथे कुस्ती स्पर्धाही घेण्यात आली.

Web Title: beed news ram shinde