बीड जिल्ह्यात ऊस लागवडीत तिप्पट वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

बीड - गतवर्षीअखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात तिपटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. गतवर्षी कापूस व तुरीला योग्य भाव न मिळाल्याने संरक्षित पाणीसाठा उपलब्ध असलेले शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार उसाचे क्षेत्र ३६ हजार हेक्‍टरवर गेले आहे.

जिल्ह्याला सलग चार वर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत होता. गतवर्षी शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात पावसाने कृपा केली आणि दोनदा अतिवृष्टी झाली. ही अतिवृष्टी एवढी तुफान होती की, एकाच पावसात जिल्ह्यातील लहान, मोठे असे सर्व तलाव तुडुंब भरले. भूजल पातळीतही मोठी वाढ नोंदविली गेली. अनेक शेतकऱ्यांकडे संरक्षित पाणासाठी उपलब्ध झाला. असे शेतकरी ऊसलागवडीकडे वळले. गत पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यात उसाचे क्षेत्र १२ हजार ५०० हेक्‍टर होते. यंदाच्या पावसाळ्यापर्यंत ते तब्बल तीनपटीने वाढले असून ३६ हजार ४९ हेक्‍टरवर पोहोचले आहे. गतवर्षी कापूस, तुरीला योग्य दर मिळाला नाही. 

Web Title: beed news sugarcane