तंत्रस्नेही शिक्षिकांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

बीड - शैक्षणिक तंत्रकौशल्य, उपक्रमांसोबत स्वत:मधील अंगभूत गुणांचे आदान-प्रदान व्हावे, या उद्देशाने काही तंत्रस्नेही शिक्षिकांनी विविध विषयांवरील सुमारे 20 व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले आहेत. जुन्नर येथील सुदाम साळुंके व चंद्रपूरच्या करुणा गावंडे यांनी पुढाकार घेत राज्यभरातील प्राथमिक शाळांच्या तंत्रस्नेही शिक्षिकांचे मोबाईल क्रमांक मिळवून हे ग्रुप तयार केले आहेत. ग्रुपचे सभासदत्व मिळविण्यासाठी एक आचारसंहिताही ठरवून दिली आहे. ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे शैक्षणिक तंत्रकौशल्य, शैक्षणिक उपक्रम आदी बाबींच्या आदान-प्रदानाबरोबरच काव्य, नाटिका अशा स्पर्धाही ऑनलाइन घेतल्या जातात. विशेष म्हणजे विविध विषयांवर ऑनलाइन कार्यशाळाही घेतल्या जात असून, ठरवून दिलेला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
Web Title: beed news teacher whats group