पाणी योजना नावाला; ठणठणाट गावाला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

बीड - जिल्ह्यात स्वजलधारा, जलस्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, मुख्यमंत्री पेयजल, आमदार निधी, खासदार निधी अशा विविध योजनांतून आतापर्यंत 1024 ग्रामपंचायतींसाठी 1350 पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या; मात्र अद्यापही यातील 350 पाणी योजनांचे काम रखडलेलेच असल्याने सदरील योजना अपूर्णच आहेत. याशिवाय मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात 41 नवीन योजनांना मंजुरी दिली गेली आहे. एवढ्या पाणी योजनेनंतरही पाणीटंचाई कायम असल्याने "पाणीयोजना नावाला अन्‌ पाण्याचा ठणठणाट गावाला' अशी या योजनांची परिस्थिती झाली आहे. 

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध फंडातून 1024 ग्रामपंचायतींअंतर्गत 1350 पाणी योजना राबविल्या गेल्या. पूर्वीच्याच एवढ्या योजना असतानाही मुख्यमंत्री पेयजल निधीतून नव्याने 41 योजनांना मंजुरी देण्यात आली. तरीही आणखी प्रस्ताव प्राप्त होणे चालूच आहे. मागील काळामध्ये जलस्वराज्य योजनेत जी गावे होती. तीच गावे भारत निर्माण योजनेतही आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता पुन्हा तोच उद्योग चालू झाला आहे. 

सध्या जिल्ह्यामध्ये शाश्‍वत शौचालय वापरासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत; मात्र सध्या अनेक गावांत पाणीच नसल्याने स्वच्छतागृहे वापरात येत नाहीत, असे सांगितले जात आहे. अद्यापही जवळपास दीड लाख लोकांचा स्वच्छतागृह अनुदानाचा निधी वाटप होणे बाकी आहे. हा निधी वाटूनही पाणीच नसेल तर एवढा गाजावाजा करून केलेल्या पाणंदमुक्तीचा फार्सच ठरणार आहे. विशेष म्हणजे स्वच्छ भारत मिशन व पाणीपुरवठा विभाग एकाच कार्यालयाकडे आहेत. असे असतानाही गावात पाणी योजना आहे की नाही? असेल तर ती कार्यान्वित आहे की नाही? कार्यान्वित नसल्याची कारणे कोणती? हे न पाहताच योजनांना मंजुरी दिली जात आहे. याशिवाय शाळांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या स्वतंत्र योजना आहेत; मात्र त्याही अनेक ठिकाणी कार्यान्वित नाहीत.

Web Title: beed news water scheme