Beed : सिनेअभिनेत्याच्या नावाने ऑनलाइन फसवणूक; गुन्हा दाखल

सोनू सूद फाउंडेशन कार्यालयातून बोलत असल्याचे समोरच्याने त्यांना सांगितले
ऑनलाइन फसवणूक
ऑनलाइन फसवणूकsakal

केज : आम्ही सोनू सुद यांच्या कार्यालयातून बोलत असून तुम्हाला आर्थिक मदत द्यायची आहे... असे सांगून अंदाजे ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवार (ता.३०) रोजी उघडकीस आला. नुकत्याच झालेल्या मुलाच्या‌ मृत्यूने दुःखात असलेल्या चौधरी कुटुंबांची सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या सायबर शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील पैठण येथे २१ मार्च रोजी जयराम हरिभाऊ चौधरी यांच्या मुलासह दोन पुतण्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता.

चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने नातेवाईक व मित्रांनी सामाजिक बांधीलकी जपत त्यांना आर्थिक मदत केली.‌ याच पैशांवर सायबर गुन्हेगारांची नजर होती. तीस मार्च रोजी जयराम चौधरी यांना फोन आला. सोनू सूद फाउंडेशन कार्यालयातून बोलत असल्याचे समोरच्याने त्यांना सांगितले.

तुम्हाला तीन लाख रुपयांची मदत करायची असून मी विचारलेली माहिती सांगा असे तो म्हणाला. त्यांना मोबाइलमध्ये एनी डेस्क ॲप डाऊनलोड करायला लावून पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड व बँक पासबुकची माहिती घेतली. त्यानंतर वेगवेगळे ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून दहा हजार, नऊ हजार ९९९, अठरा हजार ३२१, अठरा हजार २९७, पाच हजार, चार हजार आठशे तीन हजार ४९ असे एकूण ६९,५६६ रुपये ऑनलाइन काढून घेतले.

आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचे समजताच जयराम चौधरी यांनी परत त्याच क्रमांकावर फोन केला. मात्र सदरील फोन नंबर बंद होता. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी प्रथम युसूफवडगाव पोलिस ठाणे व त्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com