पंकजा मुंडेंच्या ताब्यातील साखर कारखान्यात 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्यांची चोरी

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

हा कारखाना सध्या भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या ताब्यात आहे

बीड: साहित्याची चोरी झाल्याचे समोर आलं परळी तालुक्यातील पांगरीतील वैद्यनाथ सहकारी कारखान्यात दोन महिन्यांपुर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्याआहे. हा कारखाना सध्या भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या ताब्यात आहे. या चोरीची तक्रार परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये केली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील वर्षी वैद्यनाथ सहकारी कारखाना बंद होता. नंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चोरी झाली. या कारखान्यात सध्या स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 रोजी चोरी झाली होती.

हा कारखाना सध्या भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या ताब्यात आहे

चोरीची माहिती स्टोअर कीपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली होती. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली तेंव्हा त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.

साखर कारखान्यातून काय काय चोरीला गेले?
कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा चोरी झालेल्या वस्तूंमध्ये समावेश आहे. चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं सामान चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं आहे.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beed pankaja munde sugar industry parali