Beed : परळीमध्ये संशयिताचा पोलिस कोठडीत मृत्यू

पोलिस अधिकारी तळ ठोकून
पोलिस
पोलिसsakal

परळी वैजनाथ : शहरातील एका चोरीच्या प्रकरणात मंगळवारी (ता.१३) सायंकाळी पाचच्या सुमारास जरीन खान व समीर खान या बाप-लेकाला शहर पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. रात्री दहाच्या सुमारास जरीन खान याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूस पोलिस जबाबदार असल्याचा आरोप मुलगा समीर खान याने केला. रात्री मोठा जमाव ठाण्यासमोर जमला होता. पोलिस प्रशासनातील अधिकारी शहरात तळ ठोकून आहेत.

शहरात सहा जूनला चार लाख ९० हजार रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. याच प्रकरणात संशयित म्हणून जरीन खान (वय ४८) व समीर खान (वय २६, दोघे रा. बरकतनगर, परळी) यांना शहर पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली. पोलिस कोठडीत जरीन खान यांचा रात्री मृत्यू झाला. पोलिसांनी जरीन खान यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पोलिस
Chennai Crime : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजींना अटक

डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वडिलांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप समीर खानने केल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काल मध्यरात्री पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव एकवटला होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी दाखल होत स्थिती नियंत्रणात आणली. जरीन खान यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झालेला नाही तर त्याला फिट्स येत होत्या, त्यातून ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांचे मत आहे.

पोलिस
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास वीस वर्षे सक्तमजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com