

Road Accident
esakal
शिरूरकासार : भरधाव टेंपोने दुचाकीला धडक दिल्यामुळे मामासह दोन भाच्यांचा मृत्यू झाल्याची घटना पाटोदा हद्दीतील हिवरसिंग्याजवळ मंगळवारी (ता. २९) मध्यरात्री घडली.शिरूर येथील राम बाजीराव शेळके (वय ३३) हे बीड शहरातील मंगेश रोहिदास बजगुडे (वय १९) आणि गणेश बजगुडे (वय २१) या भाच्यांना सोबत घेऊन दुचाकीने गावाकडे निघाले होते. यावेळी भरधाव टेंपोने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.