esakal | कोरोनाशी लढा : बीड पोलीसांसाठी स्वतंत्र ‘आत्मनिर्भर’ विलगीकरण कक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

बीड पोलिस.jpg
  • बीड पोलीसांसाठी खास ‘आत्मनिर्भर’ हा कोविड विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.
  • बाधा झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या कुटूंबियांना धोका वाढू नये, त्यासाठी उपाययोजना.

कोरोनाशी लढा : बीड पोलीसांसाठी स्वतंत्र ‘आत्मनिर्भर’ विलगीकरण कक्ष

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून पोलिस कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याची उदाहरणे घडली आहेत. मात्र, बाधा झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या कुटूंबियांना धोका वाढू नये यासाठी बीड पोलीसांसाठी खास ‘आत्मनिर्भर’ हा कोविड विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून हा आत्मनिर्भर विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री. पोद्दार यांच्या संकल्पनेतून पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीलाच स्वतंत्र कोविड सेल उभारुन नित्याने दुर्धर आजारी असलेल्यांची माहिती गोळा करण्यात आली. तसेच, लॉकडाऊनच्या काळात पोलिस कर्मचारी व सामान्यांसाठी पोलिस दलाने समुपदेशन केंद्रही सुरु केले आहे. या काळात पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाणे भेटीच्या निमीत्ताने जिल्ह्याची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसहतींनाही भेटी देऊन कुटूंबियांशी संवाद साधला. त्यामुळे त्यांच्या अडचणीही समोर आल्या.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पोलिसांसाठी खास विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. पोलिस मुख्यालयात उभारलेल्या या विलगीकरण कक्षात कोरोनाचा संसर्ग झालेल्या परंतु लक्षणे नसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ठेवले जाईल. त्यामुळे त्यांचा कुटुंबीयाशी किंवा इतरांशी संपर्क येणार नाही. परिणामी संसर्गाचा धोका वाढणार नाही. या विलगीकरण कक्षाचे कामकाज व नियंत्रण ' बीड पोलीस कोव्हिड सेल ' यांच्या मार्फत या सेलचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश खटकळ पाहतील.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

स्वातंत्र दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. १५) पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कक्षाचे उद॒घाटन झाले. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिना निमित्त शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कक्षाचे उद॒घाटन झाले. यावेळी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपाधीक्षक (गृह) स्वप्नील राठोड उपस्थित होते.

Edited By Pratap Awachar