काय घडले आज बीड जिल्ह्यात गुन्हे? वाचा -

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, त्यावर अंकुश ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. वाचा गुरुवारी काय काय घडले... 

बीड : जिल्ह्यात दुचाकीचोरींचे सत्र थांबेना झाले आहे. बीड शहर व परळी शहरातून पुन्हा दोन दुचाकी लंपास झाल्या. बीड येथील नगरनाका परिसरातून महेंद्र राजेंद्र भोसले यांची दुचाकी क्र.(एम.एच.05 एएन 3801) चोरट्यांनी 9 जानेवारीला हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली.

शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तर परळी शहरातील वडसावित्रीनगरातून रामकेश हरी प्रजापती या व्यक्तीची दुचाकी क्र. (एम.एच.44 आर.4935) 13 जानेवारीला घरासमोरुन चोरट्यांनी लंपास केली. परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

शेतीच्या वादातून तरुणास मारहाण

माजलगाव : शेतीच्या जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणास गज व लाकडाने मारहाण करण्यात आली. आलापूर बेलूरा (ता.माजलगाव) येथे ही घटना घडली. 

परसराम त्रिंबक फपाळ (37,रा.बेलूरा, ता.माजलगाव) असे जखमी शेतकर्‍याचे नाव आहे. 7 जानेवारीला गावात ते लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम श्रवण करत होते. तिथे आलेल्या पाच जणांनी परसराम यांना शेतीच्या जुन्या वादाची कुरापत काढत शिवीगाळ करुन गज व लाकडाने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

जखमी परसरामच्या तक्रारीवरुन बुधवारी अंगद सुदाम शिंगणे, श्रीनिवास अंगद शिंगणे, बालासाहेब बाबुराव मोगल (सर्व रा.देवळा) कालीदास नामदेव बोचरे व प्रल्हाद नामदेव बोचरे (दोघे रा.आलापूर) यांच्याविरुध्द दिंद्रुड ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

केज : 'शेतीच्या जुन्या प्रकरणात तुझ्या वडिलांस आमच्या बाजूने साक्ष देण्याचे सांग’ अशी कुरापत काढून महावीर रामधन भांगे (34 रा.डोका,ता.केज) या तरुणास चौघांनी लोखंडी गज तोंड व कपाळावर मारुन जखमी करत जिवे मारण्याची धमकी दिली.

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

मंगळवारी (ता.14) डोका येथे ही घटना घडली. जखमी महावीरच्या तक्रारीवरुन भावकीतील औदुंबर शिवाजी भांगे, दिपक शिवाजी भांगे, बाबासाहेब भागवत भांगे व ज्ञानेश्‍वर बाबासाहेब भांगे (सर्व रा.डोका) यांच्यावर केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

कार चालकाविरुध्द अंबाजोगाईत गुन्हा

अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव ते पुस रस्त्यावरुन जाणार्‍या भरधाव कारने क्र. (एम.एच.45 एन0617) दुचाकीला क्र. (एम.एच.23 के. 222) जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार फिरदोस अब्दुल कादर शेख (18 रा.परळी) या तरुणासह त्याचा सहकारी जखमी झाला. 24 डिसेंबर 2019 रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी बुधवारी (ता.15) बर्दापूर ठाण्यात जखमी तरुणाच्या तक्रारीवरुन कारचालकाविरुध्द गुन्हा नोंद झाला. उपनिरीक्षक जमादार तपास करत आहेत. 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Police Crime News Marathwada News