बीड पोलिसानी नांदेड सैनिक कार्यालयाचे वाहन परत पाठविले

प्रल्हाद कांबळे
Thursday, 9 April 2020

अतिमहत्वाच्या सेवेत असलेल्या नांदेडच्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वाहनाला बीड पोलिसांनी पुढे न सोडता त्यांना परत पाठविल्याने संताप व्यक्त होत आहे.

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असले तरी अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांना व व्यक्तीना सुरक्षा पास दिल्या आहेत. त्या पास दिसताच ती वाहने सोडावी अशा सक्त सुचना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना दिल्या आहेत. मात्र अतिमहत्वाच्या सेवेत असलेल्या नांदेडच्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वाहनाला बीड पोलिसांनी पुढे न सोडता त्यांना परत पाठविल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात येणार असल्याचे सार्जन्ट संजय पोतदार यांनी सांगितले. 

सध्या नांदेड शहरात कोकोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळला नाही. तसेच तो आढळू नये यासाठी प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. शासकिय रुग्णालय व शासकिय आयुर्वेद माहविद्यालयात या रुग्णांसाठी कक्ष तयार करण्यात आले आहेत. शहरात, सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियासाठी रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोरोना संशयीत रुग्ण आला तर त्याला तपासण्यासाठी कुठलीच वैद्यकीय कीट नाही. त्यामुळे या रुग्णालयात ताप व अन्य लक्षण तपासणीसाठी लागणारी कीट देण्यात यावी अशी मागणी नांदेड येथील मेजर बी. जे. थापा यांनी पूणे येथील त्यांच्या कार्यालयात पत्रव्यवहार केला. यावरून नांदेड सैनिक रुग्णालय (इसीएचएस) साठी एक थर्मल थर्मामीटर मंजुर करून ते घेऊन जा असे कळविले. 

हेही वाचाVideo : वर्तमानपत्र वाचनाच्या भूकेकडून समाधानाकडे

अत्यावश्‍यक यंत्र आणण्यासाठी जात होते

हे थर्मामीटर आणण्यासाठी व सध्या लॉकडाऊन असल्याने मेजर थापा यांनी सर्व शासकिय प्रक्रिया पूर्ण करुन सैनिक वाहन (एमएच२६-बीसी-४८१२) आॅन ड्यूटी असे वाहनावर लिहून व अधिकार पत्र देऊन वाहन सार्जंट संजय पोतदार यांच्या मंगळवारी (ता. सात) स्वाधीन केले. श्री. पोतदार यांनी चालक संतोष नरसीकर आणि गौत्तम सुर्यवंशी यांना सोबत घेऊन मंगळवारी ते निघाले. 

वाद नको म्हणून माघारी

परंतु त्यांचे वाहन बीड पोलिसांच्या सिमेवर गेल्यानंतर तेथील कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस निरीक्षक व हवालदाराने थांबविले. त्या वाहनाचे सर्व कागदपत्र व वाहन चालकाचा परावाना आणि पूणे येथील सैनिक कार्यालयातून थर्मल थर्मामीटर आणण्यासाठी जात असल्याचे अधिकार पत्र दाखविले. परंतु या पोलिस अधिकाऱ्यांनी व हवालदार श्री. पुजारी यांनी नांदेड सैनिक कार्यालयाच्या वाहनास जाण्यास बंदी घातली. शेवटी वाद नको म्हणून माघारी फिरल्याचे श्री. पोतदार यांनी सांगितले.  

हे उघडून तर पहा Video - पोलिसांच्या कष्टाला फळ, गुलाब पुष्पवृष्टीने झाले भाऊक

सैनिकाच्या वाहनास अडथळा

शासकिय कामासाठी व अधिकार पत्र सोबत असतांना सैनिकाचे वाहन न सोडण्याचे कारण समजले नाही. माझ्यासमोर पुणे येथून आलेल्या वाहनांना सोडल्या जात होते. मात्र त्यांनी आमचे वाहन सोडले नाही. आमच्या वरिष्ठांना बोलून अखेर माघारी फिरलो. 
-सार्जंट संजय पोतदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed police have repatriated the vehicle of the Nanded Soldiers Office nanded news