अत्यावश्यक सेवेचा पास अन॒ पिठाच्या पोत्यांत गुटखा

वैजिनाथ जाधव
Sunday, 3 May 2020

अत्यावश्यक वस्तू पुरविण्याचा पास घेत पिठांच्या पोत्यांमधून गुटखा तस्करी सुरू असल्याचा अफलातून प्रकार चेकपोस्टवर उघड झाला आहे. परिसरातील महंतटाकरी येथे पोलिसांनी २३ लाखांचा गुटखा आणि १२ लाखांचा टेम्पो असा ४५ लाखांचा ऐवज पकडला.

गेवराई (जि. बीड) : अत्यावश्यक वस्तू पुरविण्याचा पास घेत पिठांच्या पोत्यांमधून गुटखा तस्करी सुरू असल्याचा अफलातून प्रकार चेकपोस्टवर उघड झाला आहे. परिसरातील महंतटाकरी येथे पोलिसांनी २३ लाखांचा गुटखा आणि १२ लाखांचा टेम्पो असा ४५ लाखांचा ऐवज पकडला.

बीडमधून परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची शनिवारी तपासणी केली जात होती. यावेळी आयशर टेम्पोत (क्रमांक ए. के. ०१ - ५८५१) पीठाचे पोते परजिल्ह्यात घेवून जात असल्याचे चालकाने पोलीसांनी सांगितले. मात्र, तरीही पोलिसांना शंका आली म्हणून उघडून पाहिले तर आतमध्ये पिठांचे पोते कमी आणि गुटख्याचेच पोते अधिक आढळून आले.

कंडोमचा स्टॉक संपला, गर्भनिरोधक गोळ्या द्या

हा टेम्पो हैद्राबाद येथून नाशिककडे जात असल्याचे चौकशीत समोर आले. फौजदार योगेश कोरडे यांनी ही कारवाई करत टेम्पो पकडून चकलांबा पोलिसांच्या हवाली केला. पोलीस हवालदार कांबळे, कांदे, पोलिस नायक सय्यद चॉंद यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, अन्न व औषधी  प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी ए. बी. भिसे, एच. आर. मरेवार यांनी चकलांबा येथे जाऊन पकडण्यात आलेल्या गुटख्याचा पंचनामा केला. 

सहा महिन्यांच्या बाळाचे शिर कापून फेकले, कुत्र्याने पळवले

सध्या अनेक गोष्टींच्या काळ्या बाजारात किंमती वाढल्या आहेत. गुटखा, तंबाखू, देशी-विदेशी दारू आणि इतर व्यसनांच्या वस्तूंचा लॉकडाऊनमध्ये चढ्या भावाने विक्रय सुरू आहे. मात्र, पोलिस प्रशासनाने काही कारवाया केल्या, तरी काळा बाजार करणारे काही ना काही शक्कल लढवून माल बाजारात आणून विकत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Police Seized Gutkha Bags On Georai Check Post