esakal | Beed Rain: बीडमध्ये पावसाचा हाहाकार; ग्रामीण जनजीवनही विस्कळीत
sakal

बोलून बातमी शोधा

beed

Beed Rain: बीडमध्ये पावसाचा हाहाकार; ग्रामीण जनजीवनही विस्कळीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: आठवड्यात दुसऱ्यांना शनिवार - रविवारच्या मध्यरात्री अतिवृष्टी झाली आणि खरिपाचे होत्याचे नव्हते केले. पण, आता सलग तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांना पुर, तलावफुटी अशा प्रकारांनी ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. वडवणी व गेवराईत तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर, मंगळवारी पुन्हा आणखी दोन मुले वाहून गेल्याची घटना घडली. तीन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने नद्या व ओढे दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता.

वडवणी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मामला, पिंपरेखड गावांत पुराचे पाणी घुसले. पिंपरखेडच्या अनेक कुटुंबीयांनी स्थलांतर केले आहे. तर, गेवराई तालुक्यातील मारफळा येथील तलाव फुटून नदीला पुर येऊन टाकळगव्हाण व चोपड्याचीवाडी या गावांत पाणी शिरले आहे. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. केज तालुक्यातील विडा येथील घोरपडे वस्ती शिवारातील तलाव फुटून मोठे नुकसान झाले. रात्री तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी पाहणी केल्याचे डॉ. धनराज पवार यांनी सांगीतले. गेवराई तालुक्यातही महसूल विभागाच्या पथकाने पाहणी केली. गेवराई तालुक्यातील भेंड व जातेगाव तलावाचे सांडवे फुटून मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे.

हेही वाचा: मराठवाड्यात पावसाचा हाहाकार! सहा दिवसांत ६६४ पशुधनांचा बळी

बिंदूसरेच्या चादरीवरून पाणी वाहू लागले-
सोमवारीच बिंदूसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून पाणी वाहत होते. पण, धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाणी पातळीत वाढ झाली आणि मंगळवार दुपार नंतर चादरीवरूनही पाणी वाहू लागले. राष्ट्रीय महामार्गावर धरण असल्याने पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.

हेही वाचा: करुणा शर्मा सहा महिला कैद्यांसोबत बीडच्या कारागृहात

हाहाकार चोहीकडे; आपत्ती निवारण कोणीकडे-
गावांमध्ये पुर, घरांमध्ये पाणी, लोकांचे संसार उघड्यावर आल्याने हाहाकार उडाला आहे. मात्र, या काळात आपत्ती निवारण विभाग कोणीकडे असा प्रश्न पडला आहे.

loading image
go to top