Beed : शेकापचे नेते बाळासाहेब चव्हाण यांचे निधन

शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत एन. डी. पाटील यांचे ते विश्‍वासू सहकारी होते.
Balasaheb Chavan
Balasaheb Chavan sakal

घाटनांदूर : परिसरातील हातोला (ता. अंबाजोगाई) येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच बाळासाहेब अप्पासाहेब चव्हाण (वय ८६) यांचे सोमवारी (ता. २६) पहाटे निधन झाले. बाळासाहेब चव्हाण यांनी या भागात अनेक वर्षे शेतकरी चळवळ जिवंत ठेवली. शेतकरी प्रश्‍नांवर त्यांनी कायम आग्रही व आक्रमक भूमिका घेतली. शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत एन. डी. पाटील यांचे ते विश्‍वासू सहकारी होते. दुपारी दोन वाजता हातोला येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रा. टी. पी. मुंडे, बन्सीधर सिरसाठ, अंबा कारखाना चेअरमन रमेशराव आडसकर, राष्ट्रवादीचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे, राजकिशोर मोदी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे डॉ. नरेंद्र काळे, रेणा कारखाना चेअरमन सर्जेराव मोरे, दत्ता पाटील, विलास सोनवणे, यशवंत पाटील, कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष विष्णूपंत सोळंके, बाळासाहेब घुमरे, धनंजय पाटील, लक्ष्मण मोरे, हनुमंत मोरे, अमर देशमुख यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. बाळासाहेब चव्हाण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्‍वर चव्हाण यांचे वडील होत. दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय बनसोडे, अमरसिंह पंडित, माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनी राजेश्‍वर चव्हाण यांची भेट घेऊन सांत्वन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com