MSRTC: ‘लालपरी’च्या प्रेमात लाडक्या बहिणी; दिवाळीत महिलांचा ३१ टक्क्यांनी वाढला प्रवास, परिवहन महामंडळाला १९ कोटीचे उत्पन्न
MSRTC: दिवाळीत बीड विभागाच्या एसटी बससेवेला प्रचंड प्रतिसाद; २१ लाख प्रवासी, महिलांच्या प्रवासात ३१ टक्क्यांची वाढ. राज्य परिवहन महामंडळाला १९ कोटी २३ लाखांचे उत्पन्न, अतिरिक्त फेऱ्यांनी प्रवाशांचे समाधान साधले.
बीड : दिवाळीच्या पंधरवड्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाने प्रवाशांना उत्कृष्ट सेवा दिली. या काळात १७४३९ बस फेऱ्या झाल्या. ज्यात जवळपास २१ लाख प्रवाशांनी प्रवास केला.