esakal | घरगुती गॅसचा स्फोट होऊन तिघा भावांची घरे जळून खाक, डोळ्यांसमोर होत्याच नव्हतं झालं

बोलून बातमी शोधा

Beed Majalgaon News}

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला व आग लागली. जवळपास एक तास ही आग सुरू होती.

घरगुती गॅसचा स्फोट होऊन तिघा भावांची घरे जळून खाक, डोळ्यांसमोर होत्याच नव्हतं झालं
sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव(जि.बीड) : तालुक्यातील मोगरा येथील शिवाजीनगर तांडा येथे घरगूती वापराच्या गॅसचा स्फोट होऊन तिन्ही भावांचे घर जळून खाक झाले आहे. यात मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.25) दुपारी घडली आहे. मोगरा येथील शिवाजीनगर तांडा येथे अशोक रामा पवार, विकास रामा पवार, प्रकाश रामा पवार हे तिघे भाऊ राहतात.

वाचा - आईवडिलांची परिस्थिती पाहवत नसल्याने वैशालीने उचले टोकाचे पाऊल, लग्नाचे स्वप्न राहिले अधूरे

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला व आग लागली. जवळपास एक तास ही आग सुरू होती. आग आटोक्यात आणण्यासाठी माजलगाव नगरपरिषदचे अग्निशमन दलाच्या कर्मचारी यांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.
 दरम्यान ऊस, कापूस विक्रीचे रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे कॉट आदी जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अर्ध्या तासांतच पवार कुटुंबाचे तिन्ही घरे जळून खाक झाली. डोळ्यांसमोर होत्याच नव्हतं झालं आहे. प्रशासनाने पंचनामा केला असून जीवितहानी टळली असली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर