औरंगाबादमध्ये सहा लाखांचे गोमांस, कातडी जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

कोलकत्याकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला

औरंगाबाद: शहरातून गोवंश मास व कातडी घेऊन कोलकत्ता येथे निघालेला ट्रक पोलिसांनी जप्त केला. ट्रकमध्ये तब्बल पाच लाख 81 हजार रुपयांचे गोमांस व कातडी होती. ही कारवाई मंगळवारी (ता. नऊ) मध्यरात्री पैठण रोडवर करण्यात आली.

कोलकत्याकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला

औरंगाबाद: शहरातून गोवंश मास व कातडी घेऊन कोलकत्ता येथे निघालेला ट्रक पोलिसांनी जप्त केला. ट्रकमध्ये तब्बल पाच लाख 81 हजार रुपयांचे गोमांस व कातडी होती. ही कारवाई मंगळवारी (ता. नऊ) मध्यरात्री पैठण रोडवर करण्यात आली.

मंगळवारी रात्री पैठण रोडवर बारा चाकांचा ट्रक उभा होता, त्यावेळी ट्रकमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरीक जमा झाले होते. ट्रकमध्ये गोमांस असल्याची शंका आल्याने नागरीकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार वेदांतनगर पोलिसांनी मध्यरात्री धाव घेऊन ट्रक (क्र. डब्ल्यूबी -ई- 3688) ताब्यात घेतला. ट्रकची झडती घेतली असता त्यात पंधरा टन गोमांस आढळून आले. पोलिसांनी पाच लाख 86 हजार रुपयांचे गोमांस व कातडी तसेच अठरा लाख रुपयांचा ट्रक जप्त केला आहे.

पोलिसांनी ट्रक चालक मोहमद अकमल मोहम्मद असाउद्दीन (रा. कोलकत्ता) याला अटक केली आहे. ट्रकमध्ये असलेले मांस व कातडी नेमकी कशाचे आहे, हे तपासण्यासाठी पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले, त्यानंतर डॉ. तांबे आणि डॉ. काळे यांनी ट्रकमध्ये असलेल्या मांसाची तपासणी करुन अहवाल दिला, त्यानुसार हे मांस गोमास व गोवंश मांस असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त रमाकांत बुआ यांनी दिली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: beef, skin seized in aurangabad