भिक्षेकरी मुलांनी भिक्षा मागून केली पूरग्रस्तांना मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पुरामुळे मानवी जीवन उद्‌ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक भागांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा सुरू झाला. उदगीरमधूनही रविवारी (ता. 11) पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत फेरी काढण्यात आली. यावेळी बसस्थानकात भीक मागून जमा केलेली झोळीतील रक्कम लहान मुलांनी पूरग्रस्तांसाठी दिल्याने सर्वांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

उदगीर ः पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पुरामुळे मानवी जीवन उद्‌ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक भागांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा सुरू झाला. उदगीरमधूनही रविवारी (ता. 11) पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत फेरी काढण्यात आली. यावेळी बसस्थानकात भीक मागून जमा केलेली झोळीतील रक्कम लहान मुलांनी पूरग्रस्तांसाठी दिल्याने सर्वांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

रविवारी उपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, संघटना यांनी पुढाकार घेऊन छत्रपती शाहू चौकातून फेरीची सुरवात करण्यात आली. उदगीरकरांनी मदत फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दातृत्व दाखवत जीवनावश्‍यक वस्तूंचे दान केले. उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हाकेला प्रतिसाद देत उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, तहसील कार्यालय, नगरपरिषद, रोटरी क्‍लब ऑफ उदगीर सेंट्रल, मातृभूमी महाविद्यालय, उदयगिरी महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, हावगीस्वामी महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, डॉक्‍टर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ, लायन्स क्‍लब, मराठवाडा जनता विकास परिषद, जिव्हाळा ग्रुप, अडत व्यापारी असोसिएशन, उदगीर क्‍लॉथ असोसिएशन, दाल मिल असोसिएशन, सराफा व सुवर्णकार संघ, छत्रपती शिवाजी राजे मुस्लिम ब्रिगेड, नवरंग प्रतिष्ठान आदी स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी फेरीत सहभागी होऊन पूरग्रस्तांसाठी जीवनावश्‍यक वस्तू व रोख रक्कम जमा केली. 
जमा केलेल्या जीवनावश्‍यक वस्तू आणि रोख रक्कम मंगळवारी (ता. 13) कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील पूरग्रस्तांना दिल्या जाणार आहेत. 
यावेळी छत्रपती शाहू महाराज चौकातून निघालेली मदत फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलिस स्टेशन, मुक्कावर चौक, हनुमान कट्टा, सराफा लाइन, चौबारा येथून तहसील कार्यालयात समारोप करण्यात आला

यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, नायब तहसीलदार राजा खरात, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, भरत चामले, संजय बनसोडे, पंडित सूर्यवंशी, डॉ. महेश भातांब्रे, सतीश उस्तुरे, डॉ. दत्ता पाटील, डॉ. सुनीता लोहारे, प्रदीप बेद्रे, संजय राठोड, मोतीलाल डोईजोडे, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. अनिल भिकाणे, विश्वनाथ मुडपे, विवेक होळसंबरे आदी उपस्थित होते. 

फेरी संपल्यानंतरही मदतीचा ओघ 
रविवारी स्वयंसेवी संस्था, विविध संघटनांच्या मदतीने काढण्यात आलेली मदत फेरी संपल्यानंतरही अनेक व्यावसायिक नागरिकांनी फोन करून मदत देणार असल्याचे सांगून आणून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावणेदोन लाख रोख रक्कम आणि अन्नधान्य, कपडे, मेडिसीन, ब्लॅंकेट व अन्य असे एकूण जवळपास चार लाखांचे साहित्य जमा झाले असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beggars' children begged to help the flood victims