मराठा समाजाच्या वतीने मंठा येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

मंठा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.20) सकाळी 11 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

मंठा : मंठा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.20) सकाळी 11 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केले आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या धरणे आंदोलनला सुरवात झाली. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असून समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे उपस्थित आंदोलकांनी यावेळी सांगितले. यावेळी तुरळक पाऊस येत असल्याने मंडपाची व्यवस्था करण्यात आली. 
 

Web Title: On behalf of the Maratha community there is a movement for various demands at the mentha